लहानपणी आई बाबा कुठले काम करत असताना एक डायलॉग नक्की मारायचे अरे डोकं वापर, पण हे डोकं नेमकं कुठे कसं कशा पद्धतीने वापरायचं हे काय आजपर्यंत समजलं नाही. म्हणजे आत्ता समजलं असं पण नाही? जाऊदे डोकं वापरू नका उगाच खर्च होईल.
आज ऑफिसमधल्या आमच्या एक एम्पलोयी कंपनीचं पावर पॉइंट प्रेझेंटेशन बनवत होत्या. मी कंटेंट त्यांना दिले व डिझाईन मात्र त्यांना करायला सांगितले. मुळातच मी क्रिएटिव्ह वगैरे आहे असं मला कधी वाटलं नाही त्यामुळे रंग संगती, चित्र, असल्या गोष्टी आल्या की मी त्या उदार मनानी माझ्या टीमला करायला सांगतो.
त्यांनी पहिल्यांदा बनवलेले पीपीटी मी पाहिले. आणि मग सूचना द्यायला सुरुवात केल्या ( खरंतर सूचनांचा भडीमार केला). मला काय हवंय हे सांगता सांगता मानवी मन कसं विचार करत हे मात्र मी त्यांना सांगत होतो. आपल्या एका डोक्यात दोन माणसं राहतात. डाव्या बाजूचा माणूस लॉजिंक, नंबर म्हणजे आकडे, सिक्वेन्स म्हणजे क्रमाने विचार करणे एनालिसिस, शब्द, याद्या, या पद्धतीने विचार करतो. उजव्या बाजूचा माणूस मात्र त्रिमितीय आकृत्या, दिवा स्वप्न , एकूण असलेले भान आणि जाणीव, चित्र, रंग, भावना या सगळ्या बाजूने विचार करतो.
खरंतर माणूस विचार कसा करतो हीच एक मस्त समजून घेण्यासारखी प्रक्रिया आहे.
एक प्रश्न तुमची भाषा कोणती? What is your prime language?
जरा श्वास घ्या एक क्षण मनामध्ये या प्रश्नाचे उत्तर द्या. ओ पन तुमचे उत्तर चुकतंय तुम्ही जर तुमची भाषा मराठी इंग्रजी तमिल तेलगू मल्याळम किंवा एक्स वाय झेड अशी काहीतरी जर सांगितली असेल तर तुमचे उत्तर चुकतंय.
विश्वास बसत नाही चला एक प्रयोग करून बघूया. पुढील दोन वाक्या नंतर मी तुम्हाला एक शब्द सांगणार आहे. तो शब्द वाचला की क्षणभर थांबायचं डोळे बंद करायचे आणि डोक्याच्या सुपर कम्प्युटरला एंगेज करायचं आणि नेमक काय काय होतंय डोकं कुठे फिरून येतंय त्याला काय आठवतंय हे सगळं क्षणभर आठवा.
रेडी…. शब्द आहे आंबा म्हणजे शुद्ध मराठीत mango
मग काय तुमच्या सुपर कम्प्युटरने तुमच्यासोबत समोर आंबा असे शब्द टाईप केले की m a n g o असे स्पेलिंग टाईप केले. नक्कीच असं काही झाले नाही.
चला तुमच्या सुपर कम्प्युटरने तुम्हाला काय सांगितलं हे जवळून बघूया.
बरं ही सगळी प्रोसेस करायला तुमच्या सुपर कम्प्युटरला किती वेळ लागला
किती विचित्र गोष्टींशी तुमचा आंबा जोडलेला आहे
याशिवाय तुमच्या डोक्यात काय आलं
कुठले रंग या आंब्यासोबत तुमच्या डोक्यात स्पष्ट झालेत
तुमच्या डोक्यांनी आंब्याचा पोत चव सुगंध कुठे खाल्ला होता त्याची जागा अशा अनेक गोष्टींचा विचार केला की नाही.
हे सगळं झालं असेल तर मी म्हणेल तुमची भाषा माणसांची भाषा आहे वेलकम टू ह्यूमन रेस. Welcome to human race.
माणूस केवळ शब्दांनी बोलत नसतो किंवा समजून घेत नसतो तो अनेक अंगांनी समजून घेतो. आणि म्हणूनच आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. पीपीटी बनवताना महत्त्वाचं काय , किंवा एखाद्या माणसाला समजून सांगायचे असल्यास महत्त्वाचं काय,😄
आकडे शब्द हे जसे महत्त्वाचे तसेच चित्र रंग आकृत्या यादेखील तितक्याच महत्त्वाच्या. पीपीटी बघणारा माणूस डाव्या बाजूने विचार करतो का उजव्या हे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून पीपीटीवर दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आपल्याला पाहिजे असतो.
पीपीटीवर चित्र देखील हवं आणि काही शब्द आणि आकडे देखील हवे.
Finally awareness is important.