भयपट आणि भीती

Feb 2, 2025 | Life, Mindfulness, Skills

काही दिवसांपूर्वी एक स्त्री २ नावाचा भयपट बघण्यात आला. आता प्रत्येकाची भयपट बघण्याची पद्धत वेगवेगळी असते. मला मुळात भयपट फार आवडत नाहीत पण काहीच बघायला नव्हतं म्हणून तो भयपट चालू केला. भयपट म्हणजे शुद्ध मराठीत हॉरर मूवी.

तर, मी भयपट कसा बघतो. पूर्ण आवाज बंद करायचा, सब टायटल्स चालू करायचे, व नंतर शांतचित्ताने सब टायटल्स वाचत तो भयपट बघायचा. भयपटाचा विनोदी चित्रपट कसा होतो हे त्यातून कळतं.

या हॉरर मूव्हीज चा आत्मा असतो, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक. अचानक वाढणारा आवाज, अंधार, पात्रांचा उडणारा गोंधळ, याच्यातील चढ-उतार जेवढे जास्त तेवढा भयपटाचा चा दणका जास्त.

    Related Posts