आज एका प्रोजेक्ट संबंधी बोलणं चालू होतं. प्रोजेक्ट देणारा एक जुना मित्र होता. पहिले कामाच्या, मग पैशांच्या, मोबदल्याच्या आणि नंतर अवांतर गप्पा चालू झाल्या. सहज त्याने प्रश्न विचारला तुम्ही श्रीमंत आहात की नाही?
एका क्षणाचाही विचार न करता मी त्याला उत्तर दिलं.
माझ्याकडे खूप चांगली माणसं आहे म्हणून मी श्रीमंत आहे.
माझ्याकडे खूप चांगली पुस्तक आहेत म्हणून मी श्रीमंत आहे
माझ्याकडे आवश्यक तेवढा पैसा आहे म्हणून मी श्रीमंत आहे
माझ्याकडे संधी आहे म्हणून मी श्रीमंत आहे
माझ्याकडे काम करण्यास योग्य असे शरीर आहे म्हणून मी श्रीमंत आहे
माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी श्रीमंत आहे.
काय वाटतं तुम्हाला एवढी श्रीमंती पुरेशी का आणखीन श्रीमंती यावी?
Money is nothing but options and opportunities.