Opening The Door Of Your Heart

Mar 3, 2025 | Kindness, Gratitude, Life, Mindfulness, Personal Development

“जे काही करशील, तु जे काही आहेस, तरीही – माझ्या मनाचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी खुला आहे!”

ही कथा “Who Ordered This Truckload of Dung?” या अप्रतिम पुस्तकातून घेतलेली आहे, ज्याचे लेखक आहेत Ajahn Brahm ( दयाळूपणाच्या मूळ गाभ्याकडे नेणारे एक शांत, साधं, पण प्रभावशाली व्यक्तिमत्त्व.)

_____________________________________________________________________________________________________________________________________

खूप शतकांपूर्वीची गोष्ट आहे. आशियाच्या एखाद्या घनदाट जंगलातल्या गुहेत सात भिक्खू unconditional love म्हणजेच अटींशिवाय प्रेम यावर ध्यान करत होते..

  • त्या सात भिक्खूंमध्ये प्रमुख भिक्खू होता
  • त्याचा भाऊ,
  • त्याचा जिवलग मित्र,
  • आणि एक भिक्खू ज्याच्याशी त्याचं फार जमत नसे—दुश्मनीच म्हणायची.
  • पुढचा भिक्खू खूप म्हातारा होता, कधीही मरण येईल अशी अवस्था.
  • सहावा भिक्खू फारच आजारी होता, तोसुद्धा मृत्यूच्या दाराशी. आणि
  • सातवा? तो तर सगळ्यांना कंटाळा आणणारा—म्हणजे ध्यान करताना घोर घालत असे, पाठ केलेले श्लोक विसरे किंवा बेसूर म्हणे. पण तरीही सगळे त्याला सहन करत, आणि मनोमन त्याच्या मुळे आपल्यात “धैर्य” वाढतंय हे मान्य करत.

एक दिवस काही दरोडेखोर त्या गुहेपर्यंत पोचले. एवढ्या आतमध्ये अशी जागा मिळाल्यामुळे त्यांनी ठरवलं की ही गुहा त्यांनी आपल्या अड्ड्यासाठी वापरायची—आणि म्हणून सर्व भिक्खूंना मारायचं. पण सुदैवाने प्रमुख भिक्खू खूप प्रभावशाली वक्ता होता. त्याने कसंबसं बोलून दरोडेखोरांना मनवले की, “सगळ्या भिक्खूंना सोडा, शिक्षा म्हणून फक्त एकालाच मारा.”
प्रमुख भिक्खूला काही वेळ विचार करायला दिला गेला—की कोणाला निवडायचं बलिदानासाठी?


इथे मी तुमच्याकडे एक प्रश्न टाकतो, वाचकांनोतुमचं काय मत आहे? कोणाची निवड झाली असेल बलिदानासाठी?

भाऊ?
मित्र?
शत्रू?
म्हातारा किंवा आजारी?
का तो गोंधळ करणारा “useless monk”?

अनेकांनी अंदाज लावले—शत्रू असेल, बहुतेक.
“चुकलंत.”
“मग useless monk?”
“तेही नाही.”

उत्तर अगदी वेगळं होतं—कोणालाही निवडता आलं नाही.

प्रमुख भिक्खूचं प्रेम इतकं खोल, समरस आणि निःस्वार्थ होतं की त्याला सगळ्यांबद्दल सारखंच प्रेम होतं—भाऊ, मित्र, शत्रू, म्हातारा, आजारी, आणि अगदी तो गोंधळ करणारा भिक्खू सुद्धा.

त्याच्या मनाचा दरवाजा सगळ्यांसाठी एकसारखा खुला होता.


“The door of my heart is always open to you–whatever you do, whoever you are.”
ही भावना त्याने केवळ इतरांसाठी नव्हे, स्वतःसाठीसुद्धा ठेवली होती.
म्हणूनच तो कोणालाही निवडू शकला नाही—कारण त्याचं प्रेम सगळ्यांसाठी, आणि स्वतःसाठीही, एकसारखं होतं.


आपल्या संस्कृतीत आपण सतत स्वतःला झिडकारतो, education, society आणि संस्कार आपल्याला शिकवतात की “स्वतःला मागे ठेवणं हेच सच्चं प्रेम.” पण खरंतर “Love thy neighbor as thyself—हा संदेश आहे. म्हणजे ना स्वतःपेक्षा जास्त, ना कमी—पण तितकंच.

आपण इतरांना क्षमा करतो, प्रेम करतो, पण स्वतःबाबत किती कठोर असतो? आपण स्वतःला दोष देतो, education किंवा professional life मधील चुकांबद्दल guilt बाळगतो, आणि स्वतःच्या मनाचं दार स्वतःसाठीच बंद करत राहतो.


मग खरं प्रेम काय असतं?
ते म्हणजे स्वतःला स्वीकारणं, क्षमा करणं, guilt च्या तुरुंगातून बाहेर येणं.
आपण मनात म्हटलं पाहिजे:

हो रे, मी माझा आहे, चुकलो असेन, पण तरीही
माझं मनाचं दार माझ्यासाठी खुलं आहे. Come in.”

“The door of my heart is open to me as well!”
हे शब्द स्वतःला मनापासून म्हणणं म्हणजे क्षमा करणे, guilt च्या तुरुंगातून मुक्त होणे, आणि मनःशांती गाठणे.
आणि हो – “Perfect” होण्याची वाट बघायची गरज नाही—कारण acceptance मधेच perfection आहे.


मग त्या सात भिक्खूंचं पुढं काय झालं?
कथेत सांगितलं नव्हतं… पण माझ्या मनात उत्तर स्पष्ट आहे –
प्रमुख भिक्खूने जेव्हा दरोडेखोरांना हे सगळं प्रेमाचं आणि क्षमेसंबंधी सांगितलं… तेव्हा ते सुद्धा इतके प्रभावित झाले की त्यांनी ना फक्त सगळ्या भिक्खूंना सोडलं, तर स्वतःसुद्धा भिक्खू झाले!

छोटे पण प्रभावी Action Steps:

🔹 स्वतःला दोष देणं थांबवा—तेवढाच प्रेमाचा हक्क स्वतःलाही द्या.
🔹 दररोज स्वतःला एक प्रेमळ वाक्य बोला—“मी माझा आहे, आणि मी चांगला आहे.”
🔹 आपल्या चुका, अपूर्णता, कमतरता यांना सामोरे जा—त्यांचा स्वीकार कराआणि दूर करण्याचा प्रयत्न करा .
🔹 दुसऱ्याला जितकं क्षमा कराल, तितकंच स्वतःलाही करा.

विचार करा:

तुमचं मनाचं दार स्वतःसाठी खरंच उघडं आहे का? की अजूनही guilt, shame आणि expectations ने ते बंद ठेवलंय?

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत नक्की सांगा, बरं का!!

    Related Posts