नमस्कार मित्रहो! आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या टीम आणि संस्थेचं भविष्य ठरवू शकतो. प्रश्न असा आहे:“वर्क कल्चरमध्ये ‘फॅमिली’ बनवायचं की ‘टीम’?”
“फॅमिली” कल्चरची मोठी चूक
तुमच्या ऑफिसमध्ये, टीममध्ये “आपण सगळे एक फॅमिली आहोत!” असं म्हणणं तुम्हाला छान वाटेल. पण सत्य हे आहे की, “फॅमिली कल्चर” अनेकदा “dysfunctional” (अपकार्यक्षम) होतं. का?
- Entitlement (हक्काची भावना):
“काहीही झालं तरी ते आपले आहेत“, म्हणून लोकांची जबाबदारी घेणं अवघड होतं. - Accountability ची कमतरता:
चुकीच्या वागणुकीला “family आहे म्हणून” माफ केलं जातं. - कामगिरीत ढिलाई:
“Family आहे, adjust करू“, अशा मानसिकतेमुळे उच्च परफॉर्मन्स मिळत नाही.
“फॅमिली” कल्चरचे धोके (एक उदाहरण):
तुम्ही “Godfather” सिनेमा पाहिला असेल. “Family Business” म्हणून चालणाऱ्या या व्यवसायाचं शेवटी काय होतं? “Family आहे” म्हणून चुकीच्या व्यक्तींना काढून टाकता येत नाही, आणि शेवटी संपूर्ण संस्था आतून कमकुवत होते.
मग उपाय काय? “टीम” कल्चर!
“टीम” आणि “फॅमिली” यातला फरक काय?
- “टीम” म्हणजे “परफॉर्मन्सवर” भर दिला जातो.
- “टीम” म्हणजे “Accountability” असते.
- “टीम” मध्ये “हक्काची भावना नाही, जबाबदारीची भावना” असते.
उत्तम संस्थांची उदाहरणं:
“Netflix चे CEO Reed Hastings:“
“आम्ही फॅमिली नाही, आम्ही प्रोफेशनल स्पोर्ट्स टीम आहोत. प्रत्येकाने आपली जागा कमवावी लागते.“
“Bill Belichick (सर्वाधिक Super Bowl जिंकणारे कोच):“
“Do your job (तुमचं काम करा). एकाची चुकी संपूर्ण टीमला अपयशी करू शकते.“
“Amazon चे Jeff Bezos:“
“आमचं कल्चर friendly आहे, पण intense आहे. जर निवडायचंच झालं तर आम्ही intense निवडू. तुम्हाला ते आवडेल किंवा नाही, मध्यम मार्ग नाही.“
“Starbucks चे Howard Schultz:“
“आम्ही performance-driven team आहोत, पण humanity (मानवी मूल्यं) जपून.“
“टीम” कल्चर बनवताना लक्षात ठेवा:
- “Mission First (ध्येय प्रथम)“
- “Team & Culture Second (टीम आणि संस्कृती दुसरी)“
- “Individuals Last (व्यक्ती शेवटी)“
खऱ्या “चॅम्पियन टीम्स” त्यांच्या “लाडक्या खेळाडूंनाही” काढून टाकतात, जर ते अपेक्षित “परफॉर्मन्स” देत नसतील.
तुम्ही काय कराल?
"Family" कल्चरच्या नावाखाली "entitlement" आणू नका.
"Team" कल्चर बनवा, जिथे "performance" महत्त्वाचं आहे.
"Brilliant Jerks (हुशार पण उद्धट व्यक्ती)" नकोत. "No Axx hole Policy" ठेवा.
शेवटी एकच गोष्ट:
“टीम” आणि “फॅमिली” कल्चर यात फरक छोटा वाटला तरी “परिणाम मोठा” आहे. “एकात अपयश आहे, दुसऱ्यात यश.” योग्य निवड करा!चला तर मग, “टीम कल्चर” स्वीकारा आणि तुमच्या संस्थेला यशस्वी बनवा!
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत नक्की सांगा बरं का!