नमस्कार मित्रहो! आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या टीम आणि संस्थेचं भविष्य ठरवू शकतो. प्रश्न असा आहे: “वर्क कल्चरमध्ये ‘फॅमिली’ बनवायचं की ‘टीम’?”
फॅमिली कल्चरची मोठी चूक
तुमच्या ऑफिसमध्ये, टीममध्ये “आपण सगळे एक फॅमिली आहोत!” असं म्हणणं तुम्हाला छान वाटेल. पण सत्य हे आहे की, फॅमिली कल्चर अनेकदा dysfunctional (बिघडलेलं) होतं. का?
- Entitlement (हक्काची भावना):
“काहीही झालं तरी ते आपले आहेत“, म्हणून लोकांना जबाबदार धरणं अवघड होतं. - Accountability ची कमतरता:
चुकीच्या वागणुकीला “family आहे म्हणून” माफ केलं जातं. - कामगिरीत ढिलाई:
“Family आहे, adjust करू“, अशा मानसिकतेमुळे उच्च परफॉर्मन्स मिळत नाही.
फॅमिली कल्चरचे धोके (एक उदाहरण):
तुम्ही Godfather सिनेमा पाहिला असेल. Family Business म्हणून चालणाऱ्या या व्यवसायाचं शेवटी काय होतं? “Family आहे” म्हणून चुकीच्या व्यक्तींना काढून टाकता येत नाही आणि शेवटी संपूर्ण संस्था आतून कमकुवत होते.
मग उपाय काय? टीम कल्चर!
टीम आणि फॅमिली यातला फरक काय?
- टीममध्ये परफॉर्मन्सवर भर दिला जातो.
- टीममध्ये Accountability असते.
- टीममध्ये हक्काची भावना नाही, जबाबदारीची भावना असते.
उत्तम संस्थांची उदाहरणं:
Netflix चे CEO Reed Hastings:
“आम्ही फॅमिली नाही, आम्ही प्रोफेशनल स्पोर्ट्स टीम आहोत. प्रत्येकाला आपली जागा कमवावी लागते.“
Bill Belichick (सर्वाधिक Super Bowl जिंकणारे कोच):
“Do your job (तुमचं काम करा). एकाची चूक संपूर्ण टीमला अपयशी ठरवू शकते.“
Amazon चे Jeff Bezos:
“आमचं कल्चर friendly आहे, पण intense आहे. जर निवडायचंच झालं तर आम्ही intense निवडू. तुम्हाला ते आवडेल किंवा नाही, मध्यम मार्ग नाही.“
Starbucks चे Howard Schultz:
“आम्ही performance-driven team आहोत, पण humanity (मानवी मूल्यं) जपून.“
टीम कल्चर बनवताना लक्षात ठेवा:
- Mission First (ध्येय प्रथम)
- Team & Culture Second (टीम आणि संस्कृती दुसरी)
- Individuals Last (व्यक्ती शेवटी)
खऱ्या चॅम्पियन टीम्स त्यांच्या लाडक्या खेळाडूंनाही काढून टाकतात, जर ते अपेक्षित परफॉर्मन्स देत नसतील.
तुम्ही काय कराल?
Family कल्चरच्या नावाखाली entitlement आणू नका.
Team कल्चर बनवा, जिथे performance महत्त्वाचं आहे.
Brilliant Jerks (हुशार पण उद्धट व्यक्ती) नकोत. No A**hole Rule ठेवा.
शेवटी एकच गोष्ट:
टीम आणि फॅमिली कल्चर यात फरक छोटा वाटला तरी परिणाम मोठा आहे. एकात अपयश आहे, दुसऱ्यात यश. योग्य निवड करा! चला तर मग, टीम कल्चर स्वीकारा आणि तुमच्या संस्थेला यशस्वी बनवा!
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? बरं का!




