“काही वेळासाठी विश्रांती घेतल्यास प्रत्येक गोष्ट पुन्हा व्यवस्थित चालू लागते, मग ते यंत्र असो वा तुम्ही!” – Anne Lamott
समजा तुम्ही एक महत्त्वाचं काम करायला बसलात… आणि अचानक ping – नवा मेसेज, सोशल मीडिया नोटिफिकेशन, एखादा ईमेल, किंवा कुठलं तरी ॲप तुमचं लक्ष विचलित करतं.
प्रत्येक अशा व्यत्ययामुळे focus मोडतो, वेळ वाया जातो आणि frustration वाढतं!
डिजिटल युगात हे distractions फक्त एका pingच्या अंतरावर असतात. आणि ते ping इतकं harmless वाटतं, की आपण कधी distract झालो, हेसुद्धा लक्षात येत नाही. पण हाच सततचा digital mosquito तुमचं शांत मन आणि एकाग्रता चक्क चोरण्याचं काम करतो.
माझं स्वतःचं उदाहरण:
मी माझ्या dedicated work hoursमध्ये फोन silent modeवर ठेवतो. आणि एक minimalistic launcher app वापरतो – ज्यात फक्त गरजेचे apps आणि शांत, clutter-free स्क्रीन असते. त्यामुळे नको त्या गोष्टी आपोआप दूर राहतात. यामुळे कामात focus टिकतो आणि mind clear राहतं.
Mute करण्याचा Positive Effect:
- Non-essential notifications बंद केल्या तरी तुम्ही गरजेच्या गोष्टींसाठी reachable राहता.
- खरंतर University of British Columbiaच्या एका study नुसार (Kushlev, Proulx आणि Dunn, 2016), notifications बंद ठेवल्यावर लोकांमधली inattention आणि hyperactivityची लक्षणं कमी झाली.
छोटे पण प्रभावी Action Steps:
- Essential काय आहे ते ठरवा: Notificationsची यादी घ्या. आणि ठरवा – काय खरंच महत्त्वाचं आहे? बाकी सगळं कट करा.
- Noise बंद करा: Non-essential alerts ओळखा आणि तात्काळ बंद करा. Too drastic वाटलं, तरी reset करता येतं!
- Regular Audit ठेवा: दर महिन्याला एकदा notificationsचं review करा. नव्याने install केलेल्या appsचे alerts check करा.
विचार करा:
तुमचा आणि तुमच्या फोनचा सध्या कसा संबंध आहे? रोज किती वेळा नको त्या notificationsमुळे तुमचं लक्ष उडतं? आणि त्या distractionsमुळे तुमची productivity कशी घसरते?
Focusसाठी शांतता लागते – आणि ती शांतता तुम्ही तुमच्या notification settingsमधून सुरू करू शकता!
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? , बरं का!!




