“कालच्या गोष्टींना आजचा दिवस व्यापू देऊ नका.” – Will Rogers
कधी तुमचं असं झालंय का – दिवसाची सुरुवात मोठ्या उमेदीनं केली, पण उशिरा उठलात, workout miss झालं आणि deadline हातातून गेली?
मग वाटतं – “आजचा दिवस गेला वाया!”
पण खरंच का? सकाळ बिघडली की सगळं बिघडतं का?
याच trapमध्ये आपण अडकतो – जिथे एक चुकीचा quarter आपलं संपूर्ण focus, mood आणि action पार गंडवतो.
यावर उपाय – Four Quarters Rule!
Productivity expert Cal Newportचं एक मस्त technique – Four Quarters Rule.
तुमचा संपूर्ण दिवस 4 भागांमध्ये divide करा:
- सकाळ (4 ते 11 वाजेपर्यंत)
- मध्यान्ह (11 ते 2 वाजेपर्यंत)
- दुपार (2 ते 6 वाजेपर्यंत)
- संध्याकाळ (6 ते 10 वाजेपर्यंत)
प्रत्येक quarter संपला की, त्या वेळेचा थोडासा विचार करा – काय जमलं, काय राहिलं? पुढच्या quarterमध्ये कसं सुधारायचं?
माझं स्वतःचं उदाहरण:
मी दिवस 4 वाजता सुरू करतो.
4 ते 10 वाजेपर्यंतचा time माझा पहिला quarter असतो – ज्यात मी meditation, exercise, learning आणि reflection करतो. 10 ते 11 ही माझी team meeting आणि जेवणाची वेळ, जी सहसा चुकत नाही.
मग 11 ते 2 या दुसऱ्या quarterमध्ये core कामं, meetings, planning.
पुढचे दोन quarters माझ्या operational आणि creative कामांसाठी असतात.
एखादा quarter बिघडला तरी मी reset करतो – पुढचे चार तास चांगलं करू शकतो हे स्वतःला सांगतो!!
या Ruleमुळे “दिवस वाया गेला” असं म्हणायची वेळच येत नाही – कारण दर चार तासांनी आपण पुन्हा नवीन सुरुवात करू शकतो!
छोटे पण प्रभावी Action Steps:
- Quarter Define करा: दिवसाचे 4 भाग ठरवा – वेळेनुसार आणि कामानुसार boundaries ठेवा.
- Quarter Reminder ठेवा: दर quarterच्या शेवटी छोटा pause – काय जमलं ते पाहा, पुढच्या quarterसाठी set व्हा.
- Quarter Goal ठरवा: प्रत्येक भागासाठी छोटं, specific goal ठेवा. एक quarter हातातून गेला तरी पुढच्या quarterमध्ये सुधारायची संधी असते.
विचार करा:
तुमच्यासाठी एखादा unproductive दिवस आठवा. जर त्यावेळी Four Quarters Rule वापरला असता, तर तुम्ही reset करून तो दिवस वाचवू शकला असतात का?
दिवस हातून निसटू न देता – तो पुन्हा हातात घेण्याचं सामर्थ्य या techniqueमध्ये आहे.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? , बरं का!!




