Two Kinds of Freedom – खरं स्वातंत्र्य कोणतं?

Pencil sketch: one figure runs after tangled balloons; the same figure sits calm in a violet circle as balloons drift away

“मला जे पाहिजे ते मी करू शकतो!”

– हे वाक्य आपल्याला स्वातंत्र्याचा अनुभव देतं का?

की…

“मला काहीच हवं नाही, कारण मी आतून पूर्ण आहे!”

– हे वाक्य अधिक खोल आणि शांत करतं का?

आपल्या आयुष्यात दोन प्रकारचं स्वातंत्र्य असतं:

  1. Freedom of desires – म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य
  2. Freedom from desires – म्हणजे इच्छांपासूनच मुक्त होण्याचं स्वातंत्र्य

आजचं आधुनिक जग पहिल्या प्रकाराच्या स्वातंत्र्यावर भर देतं. लोकांना हवं ते खरेदी करायचं स्वातंत्र्य, हवं ते बोलायचं, हवं तसं जगायचं – यातल्या बऱ्याच गोष्टींना राज्यघटनेनंही मान्यता दिलेली आहे.

पण गंमत अशी की… एवढ्या स्वातंत्र्यानंतरही लोकांना खरंच मुक्त वाटतं का?
बाह्य जगातली प्रत्येक इच्छा पूर्ण करूनही, मनात एक अधुरेपणा राहतो.

दुसऱ्या बाजूला, काही धार्मिक समुदाय (जसं की भिक्खूंचं जीवन) हे दुसऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य – इच्छामुक्ती – साजरं करतात.
काहीच हवं नाही, तरीही शांत आहे, समाधानी आहे…
इथे ना खरेदीची घाई, ना status updateची गरज, ना तुलना, ना competition.
आणि हेच खरं स्वातंत्र्य वाटतं – मनातलं स्वातंत्र्य!

Vipassana ध्यानात अनुभवलेलं –
जसजसं आपण आपल्या इच्छांकडे observing mindने पाहायला शिकतो, तसतसं त्यांचं बंधन सैल होतं.
स्वतःच्या इच्छांपासून दूर गेलं, की एकदम हलकं वाटतं – जणू काही मनानं श्वास घेतलाय!

छोटे पण प्रभावी Action Steps:

  • दररोज स्वतःला विचारा – ही माझी इच्छा खरंच आवश्यक आहे का?
  • थोडा संयम पाळा – एक दिवस काहीतरी हवंसं वाटलं तरी ते न घेता observe करा.
  • इच्छांचं निरीक्षण करा – कुठल्या भावना त्यामागे आहेत? भीती? असुरक्षितता? comparison?
  • दररोज एक वेळ अशी ठेवा जेव्हा फक्त शांती असेल – ना मोबाईल, ना खरेदी, ना entertainment.

विचार करा:

तुमचं आयुष्य “इच्छा पूर्ण करण्यासाठी” चाललंय की “इच्छांपासून मुक्त होण्यासाठी”?


हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? , बरं का!!