Begin with the End in Mind: माझी श्रद्धांजली

Pencil sketch: a figure reads a map with the end circled in violet; a winding path leads to four violet figures under a tree

काही दिवसांपूर्वी मी स्टीफन कोव्हींचं The 7 Habits of Highly Effective People पुस्तक वाचत होतो. त्यातील महत्त्वाची सवय म्हणजे सवय दोन.

शेवट मनात ठेवून सुरुवात करा किंवा begin with the end in mind ही सवय आणि त्या सवयीच्या सुरुवातीला दिलेली गोष्ट माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली.

त्या गोष्टीची सुरुवात अशी होते: त्यात आपण आपल्या प्रिय व्यक्तींसोबत एका आपल्याच प्रिय व्यक्तीच्या अंत्ययात्रेला जात आहोत आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपण बघतो तर काय? सरणावर अचानक आपला चेहरा दिसतो. हा आपलाच अंत्यविधी आहे. आजपासून तीन वर्षांनी ही सगळी माणसं आपल्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेली आहेत. तिथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार असतो. आपण आजूबाजूला नजर टाकतो. पहिला वक्ता आपल्या कुटुंबियांपैकी आहे. तर दुसरा वक्ता आपला मित्र आहे. माणूस म्हणून आपण कसे होतो त्याची झलक तो देणार आहे. तिसरा वक्ता व्यवसायातून किंवा कार्यालयातून आलेला आहे आणि चौथा वक्ता मात्र तुम्ही ज्या सेवाभावी संस्थेशी संबंधित होता त्या संस्थेतून आलेला आहे आणि हे चौघे आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी बोलणार आहेत. इथे स्टीफन कोव्ही म्हणतात की त्या व्यक्तीने काय बोलावं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या स्मरणात तुम्ही कसं राहावं असं तुम्हाला वाटतं? आणि इथेच महत्त्वाचा प्रश्न ते विचारतात. शेवट मनात ठेवून सुरुवात करा.

मी आज कशी व्यक्ती आहे हे मला ठाऊक आहे. पण मला खरंच कशी व्यक्ती व्हावंसं वाटतं आणि लोकांनी माझ्याबद्दल काय बोलावं असं वाटतं? असा प्रश्न जर मला विचारला तर खालीलप्रमाणे लोकांनी माझ्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. हे खरंच होईल की नाही? मी प्रयत्न करतोय की नाही? हे तर वेळ आणि काळ ठरवेल. The people around me will let me know whether I really lived the life which makes sense or not. But it’s my goal to be a person of my own dreams.

विकास हे एक साधे व्यक्तिमत्त्व आहेत. ते रात्री लवकर झोपतात, त्यामुळे सकाळी लवकर उठतात. ते दररोज ध्यान आणि व्यायाम करतात, त्यानंतर ते काहीतरी अतिशय महत्त्वाचे वाचन आणि लेखन करतात. त्यानंतर, ते घरातील कामांमध्ये कुटुंबियांना मदत करतात.

ते चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ट्रेकिंग आणि योगासने यांसारखे विविध प्रकारचे व्यायाम करतात. ते दररोज स्नान करतात आणि दाढी (shave) करतात. ते नेहमी नीटनेटके आणि ताजेतवाने दिसतात. त्यांचे कपडे साधे आणि स्वच्छ असतात; ते सहसा मोजकेच आणि ठराविक कपडे वापरतात. त्यांना साधे, घरगुती आणि नैसर्गिक शाकाहारी जेवण आवडते.

त्यांना त्यांच्या संगणकाच्या ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवायला आवडते; त्यामुळेच ते दररोज अभ्यास करतात आणि काहीतरी नवीन करतात. आपल्या समस्या निवारण कौशल्याचा (Problem-solving skills) फायदा अनेक लोकांना मिळावा असे त्यांना वाटते, म्हणून ते त्याबद्दल बोलतात आणि अनेक लोकांसाठी हे काम करतात. हे लोक त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देतात.

ते मृदू भाषेत बोलतात आणि समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात. ते विविध प्रकारची पुस्तके वाचतात आणि त्या पुस्तकांमधील गोष्टी सर्वांना सांगतात. ते इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषा अस्खलितपणे बोलतात. ते बुद्धिबळ खेळतात आणि त्यांना कधीकधी प्रेरणादायी चित्रपट, कथा आणि व्हिडिओ पाहायला आवडतात.

आज मी माझी श्रद्धांजली स्वतः लिहिली आहे; आता ती रोज जगायची आहे.