Unconditional Love – एका वडिलांच्या शब्दांतलं अमोल प्रेम

Pencil sketch: a parent waves from an open doorway full of violet light as a grown child walks away

“बेटा, तू आयुष्यात जे काही करशील, एक गोष्ट लक्षात ठेव… माझ्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी उघडा असेल!”

ही कथा Who Ordered This Truckload of Dung? या सुंदर पुस्तकातून घेतलेली आहे, ज्याचे लेखक आहेत Ajahn Brahm – एक भिक्खू ज्यांनी ध्यान, प्रेम, क्षमा आणि स्वतःशी मैत्री यांचा मंत्र हजारो लोकांपर्यंत पोहोचवला.


ही गोष्ट Ajahn Brahm यांची, त्यांच्याच शब्दांत:

मी तेव्हा फक्त तेरा वर्षांचा होतो. माझे वडील आणि मी एकटे होतो, त्यांची जुनी काहीशी मोडलेली गाडी एका गरीब उपनगराच्या गल्लीत उभी होती. तिथेच त्यांनी मला शांतपणे वरचं वाक्य सांगितलं – असं वाक्य ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.

त्या वेळी मला त्या शब्दांचा पूर्ण अर्थ उमगला नव्हता, पण त्यांच्या बोलण्यात काहीतरी गंभीर, खोल आणि प्रेमळ होतं हे नक्की जाणवलं – म्हणून ते माझ्या मनात कोरलं गेलं.

फक्त तीन वर्षांनी माझे वडील गेले…


जेव्हा मी थायलंडमध्ये भिक्खू झालो, तेव्हा अनेक वेळा हे वाक्य आठवत राहिलं. आमचं तेव्हाचं घर – एक सरकारी अनुदानित अपार्टमेंट, लंडनच्या गरीब भागात. फारसं खास काही नव्हतं त्यात. पण मग लक्षात आलं की बाबांनी “घराचा दरवाजा” म्हटलं असलं तरी ते मनाच्या दरवाज्याबद्दल बोलत होते.

“The door of my heart will always be open to you.”
हे होतं खरं प्रेम – Unconditional Love – एक असं प्रेम ज्यात कसल्याच अटी नाहीत.
ना “तू चांगलं वागलास तर”, ना “तू हे करून दाखवलंस तरच.”
माझं असणंच पुरेसं होतं त्यांच्यासाठी.


असं प्रेम देणं सोपं नसतं. त्यासाठी लागतं धैर्य, समजूतदारपणा आणि मोठं मन.
कधी कधी भीती वाटते – “मी एवढं प्रेम दिलं, तर लोक फायदा घेतील का?”
पण माझ्या अनुभवात, असं प्रेम मिळालं की माणूस त्याचा वापर करत नाही – तो त्याला जपतो.

मी त्या वयात बाबांचं प्रेम पूर्णपणे समजू शकलो नव्हतो, पण तेवढं पुरेसं होतं की मी त्यांना कधीही intentionally दुखावणारी गोष्ट करणार नाही – कधीही नाही.


जर तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला हे शब्द दिले – मनापासून, खऱ्या प्रेमातून –
“जे काही होईल, माझं मन तुझ्यासाठी नेहमी खुलं असेल!”
तर ती व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या पातळीवर खाली नाही, तर वर येईल.

छोटे पण प्रभावी Action Steps:
  • कोणत्याही एका प्रिय व्यक्तीला आज हे वाक्य सांगा – “तुझ्यासाठी माझं मन नेहमी उघडं आहे.”
  • स्वतःच्या pastमधला एखादा love-filled moment आठवा – कदाचित तुमचं मन उघडेल.
  • Unconditional love म्हणजे अंधप्रेम नाही, पण प्रेमात अट नसावी ही भावना मनात पेरून बघा.
  • जेव्हा प्रेम देता, तेव्हा Return Expectation सोडा – आणि त्या प्रेमाची ताकद अनुभवा.
विचार करा:

तुमच्या आयुष्यात अशी unconditional acceptance तुम्हाला कोणी दिलीये का? आणि तुम्ही ती कुणाला देता का?


हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? , बरं का!!