भाग 1
आज मी डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो होतो. माझा डायबिटीज खूप दिवसांपासून वाढलेला आहे. म्हणून डॉक्टरांना विचारलं, डोळे चेक करू का?
डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं. डायबिटीज वाढलेला असताना डोळे चेक केले, तर readings आणि अनुमान चुकीचे येण्याची शक्यता असते. म्हणजे आधी diabetes control मध्ये यायला पाहिजे आणि मग डोळे check करायचे.
हे ऐकून त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला. मग diabetes आत्ता वाढलेला का? मी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. रात्रीचं जागरण, अवेळी खाणं आणि माझ्याच काही चुकीच्या सवयी. यात अतिशयोक्ती काहीच नव्हती. माझ्या diabetes साठी मीच जबाबदार आहे.
तिथून परत आलो आणि विचार करतोय, आता काय करायचं? हा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. या वर्षीच्या माझ्या main तीन goals पैकी हा एक goal होता. Goal क्रमांक दोन म्हणजे back pain, neck pain आणि diabetes यांतून सुटून मला बाहेर पडायचं होतं.
भाग 2
नेहमीप्रमाणे बायकोनी डॉक्टरांसमोरही हात वर केले. म्हणाली, मी आता यांना काही सांगू शकत नाही. तिचं बरोबरच होतं. ती सांगून सांगून थकली, बोलून बोलून थकली. पण काही माणसं बदलत नाहीत. कारण बदलण्यासाठी काहीतरी कारण लागतं आणि मनातून इच्छा लागते. संकल्पशक्ती, दृढ इच्छाशक्ती, discipline, consistency, अशा अनेक गोष्टींचं मिश्रण लागतं. त्यातला एखादा component कमी पडला, की माणूस “पुन्हा ये रे माझ्या मागल्या” सुरू करतो.
मला सहज विचार आला. एवढं कोणीतरी घालून पाडून बोलतंय, तरी आपल्याला लाज का वाटत नाही? ते बदलावंसं का वाटत नाही? आपण एवढे निर्लज्ज झालोय का, की माझं चुकलंय असं म्हणायचं आणि तीच गोष्ट चालू ठेवायची?
भाग 3
समजा मी विचार केला, त्या मराठी गाण्याप्रमाणे, “झाले गेले विसरून जावे. पुढे पुढे चालावे.” आजपासून बदलायचं. वर सांगितलेल्या गुणांचा थोडा थोडा अंश माझ्यात आहे, असं धरून निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशीपासून कृती सुरू केली.
पण माझ्या कुटुंबाकडे माझ्या गेल्या पाच वर्षांच्या डायबिटीजची history आहे. हा माणूस काहीतरी सुरू करतो, diabetes reverse करायचा प्रयत्न करतो, काही दिवस करतो, मग सोडून देतो, पुन्हा करतो, पुन्हा सोडतो. याच्याकडे fixed agenda नाही. In short, गेल्या पाच वर्षांचं माझं reputation सांगतं की मी यात फार consistent आणि successful नाही. मग अशा वेळी माझे घरचे माझ्या कृतीला कसा पाठिंबा देतील? माझ्याशी कसं बोलतील?
मला खूपदा वाटतं, प्रयत्न करणारा माणूस जेव्हा म्हणतो, मी प्रयत्न करतो, तेव्हा तो प्रयत्नच करत असतो. शंभर टक्के यशस्वी होईलच असं नाही. समजा मी ठरवलं की diabetes सोबत लढायचं, नियमित व्यायाम करायचा, खाण्यावर ताबा ठेवायचा आणि 10-15 दिवस ते केलं. पंधराव्या दिवशी मी माझ्या so called ठरवलेल्या मार्गावरून भरकटलो. की लगेच घरचे आपलं शस्त्र काढून तयार असतात. मीसुद्धा खूपदा असाच वागतो, असं मला वाटतं.
मग करणाऱ्याचं मनोबल तुटतं, इच्छाशक्ती तुटते. तो म्हणतो, आता चुकलंच आहे तर जाऊ दे ना, अजून चुकू दे, काय फरक पडतो? त्रास त्यालाच होणार असतो आणि घरच्यांच्या बोलण्यानं तो अजून वाढलेला असतो.
इथे प्रश्न थोडा गंभीर आहे. हा प्रश्न फक्त माझा नाही. प्रश्न असा आहे की माणूस म्हणून मी कसा वागणार आणि माझं कुटुंब मला कसं support करणार? आज हा प्रश्न फक्त diabetes चा नाही. हा प्रश्न mobile च्या व्यसनात पडलेल्या मुलांचा आहे. अभ्यास न करणाऱ्या मुलांचा आहे. कुठल्यातरी व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाचा आहे. रागाच्या आहारी गेलेल्या माणसाचा आहे. अशा व्यक्तीला आपण कशी मदत करणार?
भाग 4
मला वाटतं, इथे goal नाही, system जिंकेल.
“You do not rise to the level of your goals. You fall to the level of your systems.”
– James Clear, Atomic Habits
Atomic Habits मध्ये जेम्स क्लियर एका सुंदर ठिकाणी सांगतो की सवयी चांगल्या किंवा वाईट बाजूने मतदान करत असतात आणि माणूस त्या मतदानाप्रमाणे घडत जातो.
“Every action you take is a vote for the type of person you wish to become.”
– James Clear, Atomic Habits
मला चांगला माणूस होण्यासाठी 51% मतं हवी आहेत. म्हणजे मी 100% माझ्या शब्दाला जागू शकेन असं नाही. पण लोकांच्या नजरेतलं माझं impression, माझी किंमत आणि त्यांचं माझ्याबद्दलचं evaluation बदलायचं असेल, तर त्यांना काहीतरी parameters द्यावे लागतील, मोजमापाची साधनं द्यावी लागतील. स्वतःसाठीही अशी साधनं लागतील.
म्हणजे काय? मला प्रत्येक दिवसाचा track ठेवावा लागेल, calculate करावं लागेल. आज मी व्यायाम केला का? आज जेवण नियंत्रित केलं का? वेळेवर झोपलो का? वेळेवर उठलो का? वेळेवर औषधं घेतली का?
जसजसं मी या सवयींच्या पारड्यात माझ्या दिवसाचं माप टाकत जाईन, तसतसं चित्र दिसू लागेल. आठ दिवसांपैकी सहा दिवस positive, दोन negative. महिन्याच्या शेवटी 25 दिवस positive, 5 negative. सहा महिन्यांच्या शेवटी पाच महिने positive, एक महिना negative. असं करत करत यशोगाथा build होते. याच्या उलट झालं, तर downward spiral, म्हणजे खाली जाणारा रस्ता उघडतो. यशोगाथा build झाली, तर upward spiral, म्हणजे वर जाणारा रस्ता उघडतो. मला वाटतं, याचं उत्तर एवढंच सोपं आहे.
“Success is the product of daily habits – not once-in-a-lifetime transformations.”
– James Clear, Atomic Habits
घरचे support करतील की नाही, हा त्यांचा वेगळा प्रश्न आहे. पण स्वतःसाठी मात्र काहीतरी system लागणारच. आणि कदाचित एक वेळ अशी येईल, की त्या system च्या मदतीनं आपण घरच्यांना उत्तर देऊ शकू.
हो, पाच वर्षं मी diabetic होतो. खूपदा प्रयत्न केला, non-diabetic व्हायचा प्रयत्न केला, पण धरसोड चालू होती. आता मात्र गेल्या सहा महिन्यांत माझे चांगले दिवस जास्त आहेत आणि वाईट दिवस कमी आहेत. म्हणजे माझ्या योग्य सवयींच्या पारड्यात जास्त माप आहे आणि अयोग्य सवयींच्या पारड्यात कमी.
मला वाटतं, मला जसं व्हायचंय त्याचं हे justification आहे. तुम्हाला काय वाटतं? ही पद्धत चालेल का? की आणखी काही वेगळे मार्ग असू शकतात?
“Every Olympian wants to win a gold medal. Every candidate wants to get the job. And if successful and unsuccessful people share the same goals, then the goal cannot be what differentiates the winners from the losers.”
– James Clear, Atomic Habits
Winner and loser have the same goal. Usually the winner has the goal and system. The loser has the goals only. Let’s see what we can do.
Atomic Habits
Showed me that small changes made every day, not big resolutions, decide where I end up.




